पेठवडगावात दोन घरफोड्या; १९ लाखांची चोरी

पेठवडगांव/प्रतिनिधी

येथील पोलिस स्थानकासमोरील दत्तनगरात आणि कोल्हापूर रस्त्यावरील गणेश मंदिर समोरील बंद बंगला फोडून तब्बल १९ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. या दोन्ही घटनांची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. एका रात्रीत झालेल्या दोन घरफोडीच्या घटनेमुळे पेठवडगाव शहरात खळबळ उडाली आहे. वडगाव कोल्हापूर रोडवर गणेश मंदिर समोर सचिन दत्तात्रय कदम हे शुक्रवारी (दि.६) सहकुटुंब पुण्याला गेले होते. घरी कुणी नसल्याचे पाहून शनिवारी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी वीस तोळे सोन्याचे दागिने व दोन लाख रुपयांची रोखड असा सुमारे अठरा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. तर वडगाव पोलीस ठाण्यासमोर दत्तनगर येथील बाबासो नामदेव पाटील यांच्या घरातील पाऊण लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. याबाबत पोलिसात नोंद झाली आहे.

Scroll to Top