कबनूर / प्रतीनिधी
हातकणंगले तालुक्यातील गंगानगर येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लि. या कारखान्याने २०२४-२५ या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ३,३०० रुपयांप्रमाणे एकरकमी, विनाकपात दर देण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी जाहीर केले.
कारखान्याने मागील हंगामात ऊसाला उच्चांकी दर देऊन संपूर्ण रक्कम वेळेत अदा केली आहे. सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे.
यावेळी रेणुका शुगर्सचे असोसिएटचे व्हा. प्रेसिडेंट प्रकाश सावंत, असि. डे. जनरल मॅनेजर केन सी. एस. पाटील, मॅनेजर एचआर शिरीष रासनकर, केन मॅनेजर प्रशांत चांदोबा, प्र. का. संचालक नंदकुमार भोरे उपस्थित होते.