केकमधून विषबाधा झाल्याने बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू

कागल /प्रतिनिधी


चिमगाव ता. कागल येथे पाहुण्यांनी दुकानातून आणलेला केक खावून विषबाधा झाली. यामध्ये दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि दोन मुले बहीण भाऊ असून श्रीयांश रणजीत आंगज (वय ५) व काव्या रणजीत आंगज (वय ७) अशी मृत मुलांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चिमगाव येथील रणजित नेताजी आंगज यांचे – घरी एक नातेवाईक मुलांना खाण्यासाठी कप केक घेवून आले होते. हा केक नेताजी मुलगा श्रीयांश व सात वर्षाची मुलगी काव्या यांनी खाल्ला. त्यानंतर त्यांना उलट्या होवू लागल्या. तेव्हा नेताजी आंगज यांनी या दोन्ही मुलांना मुरगूडच्या खाजगी दवाखान्यात दाखवून औषधोपचार केले. पण मुलगा अधिक अशक्त झाल्याने त्याचा मंगळवारी सकाळी दुदैवी मृत्यू झाला. त्याच्यावर चिमगाव येथे अंत्यसंकार करण्यात आले. दरम्यान श्री आंगज यांनी मुलगी काव्या हिला अत्यावस्थ अवस्थेत दवाखान्यात नेले. पण मंगळवारी सांयकाळी उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.

Scroll to Top