इचलकरंजी/प्रतिनिधी
जिल्ह्यात तापमानात घट झाली असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर रात्रीचे तापमान कमी झाले असून दिवसाही गारठा जाणवू लागला आहे. सोमवारी दिवसभर थंडी काहीशी कमी झाली असून ढगाळ वातावरण कायम होते परिणामी सोमवारी दिवसभर हलक्या पावसाच्या सरी बरसल्या.
शहरात व ग्रामीण भागात पारा उतरल्याने कान टोपी, स्वेटर यासारख्या उबदार कपड्यांची खरेदी करण्यासाठी शहरातील विविध दुकाने व हातगाड्यांसमोर लोक गर्दी करत आहेत. मागणी वाढल्याने त्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहेत.