डॉ. सुजित मिणचेकरांनी ठोकला शड्डू

 

हातकणंगले विधानसभा निवडणूक कार्यकत्यांच्या आग्रहाखातर तसेच महाविकास गाडीने आपल्यावस्ती केलेल्या अन्यायाच्या बदल्यात काँग्रेसच्या विरोध म्हणून मी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी हातकणंगले येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केली.

यावेळी शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हास पाटील यांचा सत्कार मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आता रडायचं नाही लढायचं असं मत माजी आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त करून मिणचेकर यांचा हातकणंगले विधानसभा मतदारसंघात विजय निश्चित असल्याचे सांगितले. यावेळी उल्हास पाटील मावनिक होऊन खरंच अन्याय झाला असं सांगून त्यांचे अश्रू अनावर आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, अरविंद खोत, पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top