महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. राजूबाबा आवळे सोमवारी मोठं शक्तीप्रदर्शन करीत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पेठवडगाव येथील येथून रॅलीने ते हातकणंगलेत येणार आहे. काँग्रेस कमिटी येथे कार्यकर्त्यांशी संवाद झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पेठवडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात होईल. हातकणंगले येथील काँग्रेस कमिटीजवळ रॅलीची सांगता होईल. तेथून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात येईल.