साईबाबाचरणी ६८ लाखांचा सुवर्ण मुकुट

शिर्डी / प्रतिनिधी

आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील साईभक्ताने श्री साईचरणी ७८८.४४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. या मुकुटाची किंमत अंदाजे ६८ लाख रुपये असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
शनिवारी (दि. १९) आंध्र प्रदेश मधील गुंटूर येथील साईभक्ताने श्री साईचरणी ७८८.४४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. अतिशय सुंदर कोरीव कलाकुसर केलेला हा सुवर्ण मुकुट आकर्षक आहे. मुकुटाच्या मधोमध ‘ओम’ लिहिलेले असून त्यावरती हिरवा तर खाली लाल रंगाची टिकली आहे.

Scroll to Top