नीट-यूजी परीक्षेला ६,४२६ विद्यार्थी; १३० जण गैरहजर

कोल्हापूर / प्रतिनिधी

वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमांसाठी देशपातळीवर घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट यूजी) रविवारी सुरळीत पार पडली. कोल्हापुरातील १३ केंद्रावर सुमारे ६ हजार ४२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १३० विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले.
जिल्ह्यातून सुमारे ६ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. जिल्हा प्रशासन व एनटीएच्या वतीने परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली होती. राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (एनटीए) सहसंचालक व राज्य समन्वयक अमित साळुंके यांनी परीक्षेपूर्वी कोल्हापूरला भेट दिली. त्यांनी सर्व केंद्र अधीक्षक व उपकेंद्र अधीक्षकांसाठी प्रशिक्षण सत्र घेतले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी परीक्षेसंदर्भात सूचना केल्या होत्या.
शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, कमला कॉलेज, विवेकानंद महाविद्यालय, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर, न्यू इन्स्टियूट ऑफ टेक्नॉलॉजी, सायबर कॉलेज, केआयटी कॉलेज, डॉ. डी. वाय. पाटील अॅग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्र्व्हसिटी तळसंदे आदी १३ केंद्रांवर रविवारी दुपारी २ ते ५ यावेळेत परीक्षा झाली.

Scroll to Top