विशेष प्रतिनिधी
हुपरी शहरासाठी १ कोटी ८० लाख, पेठ वडगाव शहरासाठी १ कोटी ७० लाख आणि हातकणंगले शहरासाठी १ कोटी ५० लाख असा ५ कोटी रुपयांचा निधी विकासाकरीता मंजूर झाला, अशी माहिती मंगळवारी सकाळी दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आम. डॉ. विनय कोरे, आम. प्रकाश आवाडे, खास. धैर्यशील माने, अमल महाडिक, सुरेश हाळवणकर यांचे आभार मानले.