
संग्रहित छायाचित्र
कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात असणारी एकून थकबाकी आणि त्यावरील विलंब आकार मोठ्या प्रमाणात असल्याने वर्षानुवर्षे थकबाकी वसूल होत नव्हती. परंतु, गेल्याच महिन्यात महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी दंडामध्ये 80 टक्के सवलत देण्याची योजना जाहीर केली होती. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला गेल्या एक महिन्यात नागरिकांनी प्रत्यक्ष महापालिका नागरी सुविधा केंद्रात जाऊन आणि ऑनलाईन अशा वेगवेगळ्या माध्यमातून सुमारे चार कोटी रुपयांची थकबाकी भरली. महापालिकेने दंडात सवलत दिल्यामुळे नागरिकांचे सुमारे 63 लाख 88 हजारांचा रिलिफ मिळाला.
कोल्हापूर महापालिकेचा पाणीपुरवठा विभागाची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे.यामध्ये दंडाची रक्कम मोठी होती. पाणीपट्टी आणि दंड ही मोठी रक्कम भरणे नागरिकांना शक्य नसल्याने महापालिकेने यापूर्वी कधीही दिली नाही इतकी सवलत महापालिकेने दिली.त्यामुले वसूलीला चांगला बुस्टर मिळाला आहे.
