३१ जानेवारी दिनविशेष
१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
१९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.
१९२९: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.
१९४५: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.
१९४९: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
१९५०: राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.
१९५०: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.
१९९२: राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना
१८९६: कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९८१)
१९३१: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००८)
१९७५: चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका प्रीती झिंटा यांचा जन्म.
१८८१: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार – इरविंग लँगमुइर (मृत्यू : १६ ऑगस्ट १९५७)
१८६८: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार – थिओडोर विल्यम रिचर्ड्स (मृत्यू : २ एप्रिल १९२८)
२०१५: जर्मनी देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष – रिचर्ड वोन वेझसॅकर (जन्म: १५ एप्रिल १९२०)
२००४: भारतीय व्हायोलिनवादक – व्ही. जी. जोग (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२)
२००४: गायिका व अभिनेत्री – सुरैय्या (जन्म: १५ जून १९२९)
२०००: नाटककार – वसंत कानेटकर (जन्म: २० मार्च १९२०)CCCCCC
२०००: हिंदी चित्रपटांतील गाजलेले खलनायक – के. एन. सिंग (जन्म: १ सप्टेंबर १९०८)
१९९९: ऑल जपान प्रो रेसलिंगचे संस्थापक, जपानी कुस्तीपटू आणि प्रवर्तक – गिणत बाबा (जन्म: २३ जानेवारी १९३८)
१९९४: मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक – वसंत जोगळेकर
१९८६:संगीतकार – विश्वनाथ मोरे
१९७३: नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक – रॅगनार फ्रिश (जन्म: ३ मार्च १८९५)
१९७२: नेपाळचे राजे – महेन्द्र
१९६९: भारतीय आध्यात्मिक गुरू – अवतार मेहेरबाबा (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४)
१९६१: भारतीय वकील आणि राजकारणी – कृष्णा सिंह (जन्म: २१ ऑक्टोबर १८८७)
१९५६: इंग्रजी लेखक, विनी-द-पूह पुस्तकाचे प्रकाशक – ए. ए. मिल्ने (जन्म: १८ जानेवारी १८८२)
१९५४: एफ. एम. रेडिओचे संशोधक, अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि शोधक – ई. एच. आर्मस्ट्राँग (जन्म: १८ डिसेंबर १८९०)
१९३३: इंग्रजी कादंबरीकार आणि नाटककार – नोबेल पुरस्कार – जॉन गॅल्सवर्थी- (जन्म: १४ ऑगस्ट १८६७)