वेध रायफल-पिस्तूल शूटिंग ॲकॅडमीला 23 पदके

चिपळूण (डेरवण) येथे झालेल्या डेरवण यूथ गेम्स व कोल्हापूर येथे झालेल्या दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित स्वर्गीय लतादेवी स्पोर्टस् अॅकॅडमीतर्फे पेटाळा स्कूल गेम्समध्ये रामानंदनगर येथील वेध रायफल व पिस्तूल शूटिंग अॅकॅडमीच्या खेळाडूंनी ८ सुवर्ण, ७ रौप्य व ८ कांस्य अशा एकूण २३ पदकांची कमाई केली.

१४ वयोगट ओपन साईट एअर रायफल :

मुले : ऋग्वेद खोत (सुवर्ण), चिन्मय भुईम्बर (रौप्य), आदित्य पाटील (कांस्य).
मुली – भार्गवी पाटील (सुवर्ण), सान्वी घाडगे (रौप्य).

१४ वयोगट पीपसाईट एअर रायफल :

मुले : शर्व घुगरे (रौप्य).

१७ वयोगट ओपन साईट एअर रायफल

मुले – तीर्थ पवार (सुवर्ण), शिवेंद्र खतकर (रौप्य).
मुली – स्नेहांकिता चौगुले (कास्य).

१७ वयोगट पीपसाईट एअर रायफल

मुले – वरदराज पवार (सुवर्ण).
मुली – हिरन्या सासणे (सुवर्ण), काव्यांजली नकाते (रौप्य), युगरत्न शर्मा (कांस्य).

सर्वांना आंतरराष्ट्रीय नेमबाज व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक राधिका हवालदार – बराले व रोहित हवालदार, धैर्यशील देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top