२१ एप्रिल दिनविशेष २०२५

२१ एप्रिल दिनविशेष २०२५

७५३: ७५३ ईसा पूर्व: रोम्युलस यांनी रोम स्थापन केले. (पारंपारिक तारीख)

१९६०: रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानी चे उद्घाटन झाले.

१९७२: अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.

१९९७: भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली.

२०००: आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमलात आणला.

१८६४: जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १९२०)

१९२२: स्कॉटिश साहसकथा लेखक अ‍ॅलिएस्टर मॅकलिन यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९८७)

१९२६: इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांचा जन्म.

१९३४: महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचा जन्म.

१९४५: भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांचा जन्म.

१९५०: हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म.

१८८२: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार पर्सी विल्यम्स ब्रिजमन यांचा जन्म (मृत्यू : २० ऑगस्ट १९६१)

१७९०: चिली देशाचे पहिले राष्ट्रपती मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा यांचा जन्म (मृत्यू : ५ सप्टेंबर १८७६)

१६५१: भारतीय-श्रीलंकन धर्मगुरू आणि संत जोसेफ वाझ यांचा जन्म (मृत्यू : १६ जानेवारी १७११)

१६१९: केपटाऊन शहराचे संस्थापक जॅन व्हॅन रिबेक यांचा जन्म (मृत्यू : १८ जानेवारी १६७७)

१५०९: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सातवा) यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १४५७)

१९१०: अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८३५)

१९३८: पाकिस्तानी कवी आणि तत्त्वज्ञ सर मुहम्मद इक्बाल यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)

१९४६: ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचे निधन. (जन्म: ५ जून १८८३)

१९५२: इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १८८९)

२०१३: गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)

२३४: चिनी सम्राट हानचा सम्राट झियान यांचे निधन (जन्म: २ एप्रिल १८१)

२०१०: श्रीलंकन अभियंते आणि नागरी सेवक कनागरतनम श्रीस्कंदन यांचे निधन (जन्म: १२ ऑगस्ट १९३०)

२००६: न्यूझीलंडचे वैमानिक, दुसऱ्या महायुद्धातील फ्लाइंग एस जॉनी चेकेट्स यांचे निधन (जन्म: २० फेब्रुवारी १९१२)

२००५: भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचे निधन (जन्म: ९ सप्टेंबर १९०४)

१९९६: पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि लेखक अब्दुल हफीज कारदार यांचे निधन (जन्म: १७ जानेवारी १९२५)

१९८५: ऑस्ट्रियन-अमेरिकन फॅशन डिझायनर, मोनोकिनीचे निर्माते रुडी गेर्नरीच यांचे निधन (जन्म: ८ ऑगस्ट १९२२)

१९१८: मॅनफ्रेड फॉन रिचथोफेन (द रेड बॅरन) – जर्मन लढाऊ पायलट, ज्यांना ८० हवाई लढाऊ विजयांचे अधिकृतपणे श्रेय दिले जाते. (जन्म: २ मे १८९२)

१८८९: मेक्सिको देशाचे अध्यक्ष सेबॅस्टियन लेर्डो डी तेजाडा यांचे निधन (जन्म: २४ एप्रिल १८२३)

Scroll to Top