नेज/प्रतिनिधी
नेज ता.हातकणंगले येथे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या सहकार्याने उपसरपंच मनोज कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून नेज गावाला २० लाखाचा निधी उपलब्ध झाला या निधीतून भरत उपाध्ये घर ते शिकलगार गुरुजी घर 10 लाख, बसंत कांबळे घर ते भगवान समुद्रे घर 5 लाख ते बेघर वसाहात 5 लाख रस्त सिमेंट काँक्रिट करणे आशा विविध विकास कामांचे उद्धाटन माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी उपसरपंच मनोज कांबळे बोलताना म्हणाले डॉ.सुजित मिणचेकर साहेबांनी मतदार संघाचा विकास हेच ध्येय ठेवून प्रत्येक गावात गट गट न पाहता विकास कामे केली यामुळेच त्यांना कार्यसम्राट ही पदवी जनतेने दिली आहे. आमदार असताना सुद्धा साहेबांनी विकास कामे केली आहेतच आमदार नसतानाही विकास कामे केली आहेत, पराभवानंतरही ५ वर्षे हातकणंगले येथे जनतेच्या सेवेसाठी कार्यालय सुरू ठेवलेले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून आजही जनसेवा सुरू आहे. आपल्यातील काही व्यक्तींच्या मुळे 2019 ला पराभवाला सामोरे जावे लागले हा पराभव आपल्याला 2024 ला पुन्हा गुलाल लावूनच भरून काढायचा आहे असेही ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमास माजी अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबासाहेब शिंगे,सरपंच दिपाली गोंधळी, सदस्य ज्योती नेरले, विद्या चव्हाण, ज्योती नेजकर, सजाबाई कांबळे, अनिपा मुल्ला,आकाश शिंगे,तंटामुक्त अध्यक्ष आपासो एडके, मा.सरपंच विनोद कांबळे, पोलीस पाटील पांडुरंग कुंभार, फिरोज शिकलगार सर, मधुकर कुंभार गुरुजी, दिलावर मुल्ला, शहीन शिकलगार, विशाल साजणीकर, अमीर मुल्ला, सुहास हुपरीकर, संतोष कांबळे तसेच इतर उपस्थित मान्यवर उपस्थित होते.

