दहावी परीक्षेचा निकाल १३ ते १५ मेदरम्यान ?

पुणे / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांचे डोळे दहावीच्या निकालाकडे लागलेले आहेत. दहावीचा निकाल याच आठवड्यात जाहीर होणार असून, १३ ते १५ मेदरम्यान निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. राज्य मंडळाने यंदा पहिल्यांदाच ‘सीबीएसई’चा दहावी-बारावीचा निकाल जाहीर होण्याअगोदरच बारावीचा निकाल जाहीर करण्याची किमया साधली. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बारावीच्या निकालाच्या पत्रकार परिषदेतच दहावीचा निकाल यंदा १५ मेपूर्वीच जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Scroll to Top