शिरोळ दत्त कारखान्याचे १० लाख ७० हजार ७५२ टन गाळप दुसरा हप्ता ६० रुपये खात्यावर जमा गणपतराव पाटील

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ येथील दत्त कारखान्याच्या वतीने गाळपासाठी आलेल्या उसाला एफआरपीप्रमाणे दुसरा हप्ता प्रतिटन ६० रुपयांप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. दत्त साखर कारखान्याकडून उसाचा दुसरा हप्ता मिळाल्याबद्दल शिरोळमधील शेतकऱ्यांच्या वतीने कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम ९६ दिवस सुरू राहिला. या गाळप हंगामात १० लाख ७० हजार ७५२ टन ऊस गाळप करण्यात आला. ऊस गाळपातून ११ लाख ७३ हजार ८१६ किंवटल साखरेचे उत्पादन झाले. यावर्षी कारखान्याकडे साखर उतारा सरासरी १२.२९ इतका आहे. गेल्या वर्षी गाळप हंगामात मिळालेला साखर उतारा लक्षात घेऊन त्या १२.१५ रिकव्हरीप्रमाणे शासनाने जाहीर केलेली उसाची एफआरपी ३,१४० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वी जमा करण्यात आली होती. शेतकऱ्यांना प्रतिटन ६० रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाला प्रतिटन एकूण ३ हजार २०० रुपये मिळाले आहेत.

Scroll to Top