जादा परताव्याच्या आमिषाने दीड कोटींचा गंडा

इचलकरंजी / प्रतिनिधी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून महिलेसह तिच्या नातेवाईकांची तब्बल १ कोटी ४७ लाख ८७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही फसवणुकीची घटना ४ ऑगस्ट २०२१ ते ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सांगलीत घडली.
याप्रकरणी अनिल बाबूराव पाटील (वय ५९, सावरकर कॉलनी; मूळ जत) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आशुतोष प्रकाश कासेकर (मीरारोड, मुंबई), पूनम भीमराव भोसले ऊर्फ जाधव (चेतना पेट्रोल पंप जवळ, सांगली) आणि कुणाल सुरेश मिस्त्री (कोल्हापूर) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी अनिल पाटील हे सेवानिवृत्त असून सध्या ते आपल्या कुटुंबीयांसह विश्रामबाग परिसरातील सावरकर कॉलनीत राहतात. पाटील यांच्या नातेवाईक असणाऱ्या शोभा शिवगोंडा जैनावर यांना प्रथम पैशांचे आमिष दाखवून त्यांला थोडा परतावा दिला. यानंतर अनिल पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन त्यांना अधिक पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शेअर मार्केटमध्ये असलेल्या कंपनीमध्ये चांगला परतावा देतो, असे सांगितले. यातील काही रक्कम दिली. परंतु उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ केली. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

Scroll to Top